सोलापूर : देशामध्ये वाढत असलेली बेरोजगार, नवीन शैक्षणिक धोरण, खाजगीकरण अशा सर्व गंभीर मुद्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने "शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवा" या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी, २० फेब्रुवारी रोजी सकाळी मशाल प्रज्वलित करण्यात आली.
भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एका दिवशी "शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवा" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम सोलापूर शहरात जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आला. या निमित्ताने सुपर मार्केटसमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ' क्रांतिज्योत ' प्रज्वलित करण्यात आली.