मुंबई : महाराष्ट्राचे महागायक विजेते तथा सोलापूर जिल्ह्याचे ब्रँन्ड अॅम्बेसिडर मोहंम्मद अयाज यांना पद्मभूषण पार्श्वगायक उदित नारायण यांच्या हस्ते अखंड भारत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा गौरवाचा पुरस्कार सोहळा स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाऊंडेशन ऑडोटोरियम अंधेरी येथे नुकताच पार पडला.
हा पुरस्कार देताना संगीत क्षेत्रात काम करत-करत सामाजिक एकोपा व राष्ट्रीय एकात्मता चे संदेश आपल्या गाण्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे गायक मोहंम्मद अयाज यांना हा पुरस्कार देताना आनंद होतोय, असे उदित नारायण यांनी म्हणाले.
आगामी काळात आपण प्रगतीपथावर काम करत राहिल्यास आपली दखल पद्म सम्मानसाठी ही घेण्यात येईल. या पुरस्कार सोहळ्यात उदित नारायण, विजय बेनेडी, वैभव शर्मा, अमन त्रीका, डॉ. सहाय यांच्यासहसह देश-विदेशातील अनेक विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र : मोहम्मद अयाज यांना पुरस्कार प्रदान करताना पद्मभूषण उदित नारायण, डॉ. अजय सहाय छायाचित्रात दिसत आहेत.