Type Here to Get Search Results !

शिवश्री राम गायकवाड आणि पोपट भोसले यांचा अन्य जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घ्यावा आदर्श : सुभाष कोल्हे


मातृतीर्थ सिंदखेडराजा : समाजात देणाऱ्यांचे हात हजारो आहेत, पण त्या साठी मागणारे प्रामाणिक हात कमी आहेत. आजपर्यंत लाखो रुपयांचं साहित्य जिजाऊ सृष्टीवर देणाऱ्या राम गायकवाड आणि पोपट भोसले यांचा आदर्श इतर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घ्यावा, असे मत जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ प्रमुख सुभाष कोल्हे यांनी व्यक्त केले. 

मराठा सेवा संघाचं मातृस्थान म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान असलेलं सिंदखेडराजा येथे जिजाऊ सृष्टी साकारत आहे. येथे वर्षभरात लाखो लोक येत असतात. त्यांच्या सोयीसाठी येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मराठा सेवा संघाचे सोलापूर शहरातील जुने पदाधिकारी राम गायकवाड आणि पोपट भोसले यांनी मागील दहा वर्षांपासून गादी, सतरंजी, टाॅवेल, मॅट, चटई, चादर, खुर्ची भेट दिली. यंदाच्या वर्षी जवळपास तीन लाख रुपयांच्या १७० फोम गाद्या दिल्या.


कोणतंही पद नसताना ही शिवश्री राम गायकवाड आणि पोपट भोसले यांनी जे योगदान दिलं आहे, ते विद्यमान पदाधिकाऱ्यांना आदर्शवत आहे. १२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येताना जिजाऊ सृष्टीसाठी उपयुक्त साहित्य घेऊन यावं, असं आवाहनही जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ प्रमुख सुभाष कोल्हे यांनी यावेळी केले. 

या प्रसंगी जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवराव, मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, जिजाऊ सृष्टीचे मुख्य अभियंता पुरुषोत्तम कडू, रविंद्र चेके, छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्ष धनंजय पाटील, अकोल्याचे सागर निर्मळ, शाहीर पाटील उपस्थित होते.