श्रीमती शालिनीताई इंगोले, सहाय्यक ग्रंथालय संचालक, पुणे तथा अध्यक्ष ग्रंथोत्सव आयोजन समिती सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.
जिल्हा ग्रंथोत्सव समितीच्या बैठकीत सर्व ११ तालुक्यामध्ये तालुका ग्रंथालयांच्या वतीने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हास्तरीय निबंधस्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून समाज माध्यमात वाचन संस्कृतीचे महत्व या विषयावर खुले गटातून निबंध मागविण्यात आले आहे तर शालेय विद्यार्थी गटातून मला आवडलेले पुस्तक या विषयावर १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत निबंध मागविण्यात आले आहेत. सदर निबंध सोलापूर जिल्हयातील सर्व तालुक्यातील तालुका ग्रंथालय येथे स्विकारण्यात येतील. तसेच अधिक माहितीसाठी समितीचे सदस्य कुंडलीक मोरे 9404666488 यांच्याशी संपर्क करावा.
या वेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय पवार, गुलाबराव पाटील, कार्यवाहक साहेबराव शिंदे, अन्सार शेख, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, कल्यानराव शिंदे, ग्रंथालय कार्यकर्ते ग्रंथमित्र कुंडलीक मोरे, प्रकाश शिंदे, तालुका ग्रंथालयाचे ग्रंथपाल धोंडीराम जेऊरकर, दत्तात्रय बाबर, सुधाकर खैराटे, सुरेश यादव, छायाताई आखाडे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रविन पाठक, रणजित भंडारे, श्रीमती गीताताई देशपांडे, दत्तात्रय घोलप, दिलीप देशपांडे, ग्रंथालय निरिक्षक प्रमोद पाटील, प्रदीप गाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या दोन दिवसीय कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह ग्रंथप्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात येणार असून साहित्य अकादमी, शासकीय प्रकाशने, बालभारती, शब्द शिवार प्रकाशने, ऋषिकेश बुक एजन्सी, नंदादिप प्रकाशन, सुविद्या प्रकाशन, नाथ प्रकाशन सातारा, अरविंद बुक डेपो, पुणे, युनिक प्रकाशन पुणे अशा विविध प्रकाशनांची ग्रंथ दालने उपलब्ध होणार असून सोलापूर जिल्हयातील ग्रंथ व वाचक प्रेमींनी या ग्रंथ महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.