विनापरवाना देशी गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे बाळगल्याने तरुण अटकेत
सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकास पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोमवारी, १८ डिसेंबर रोजी, गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदीप पाटील व त्यांचे तपास पथकाने संत चोखा मेळा मंदिर, लक्ष्मी पेठ, सोलापूर येथे रोडलगत, एक लाल रंगाच्या थांबलेल्या एम.एच.१३ ई.एफ.००९७ ही स्विप्ट कार चालकाची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल आणि जीवंत काडतुसे मिळून आली. या कारवाईत एक देशी बनावटी गावठी पिस्तुल, १० जिवंत काडतुसे, व त्यांचेकडे मिळून आलेली कार असा एकूण ७.६० लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आला.
त्या कार चालकास, त्याचे नांव पत्ता विचारता, त्याचे नाव मनोज बिभीषण सुरेराव (वय-३८ वर्षे, व्यवसाय-शेती, रा.३८१, लक्ष्मी पेठ, दमाणी नगर, सोलापूर) असे असल्याचे सांगितले. त्याच्या अंगझडतीत त्याच्या पॅन्टमध्ये डावे बाजूस कंबरेजवळ एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल खोचलेल्या अवस्थेत मिळून आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात १० जिवंत काडतूस मिळून आली. ते पिस्तुल व काडतुसे ही बेकायदा विनापरवाना त्याने जवळ बाळगलेचे चौकशीत निष्पन्न झालेने, सपोनि संदीप पाटील यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
ही कामगीरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. संदिप पाटील, श्रीनाथ महाडीक व पोलीस अंमलदार अंकुश भोसले, विजयकुमार वाळके, मपोह/अर्चना स्वामी, विद्यासागर मोहिते, गणेश शिंदे, सुभाष मुंढे, शैलेश बुगड, अभिजीत धायगुडे, आबाजी सावळे, मपोना/निलोफर तांबोळी, मपोकॉ/रत्ना सोनवणे, सायबर कडील अविनाश पाटील, चालक बाळासाहेब काळे यांनी पार पाडली.