Type Here to Get Search Results !

दिव्यांग व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध; जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन


सोलापूर : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दि. १० जून, २o१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा आहे.

या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज) करण्यासाठी दि. ०३ डिसेंबर, २०२३ रोजी पोर्टल प्रक्षेपित करण्यात आले असून, दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींनी दि. ०४ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. तसेच या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहनही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.