Type Here to Get Search Results !

शुक्रवारी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

शुक्रवारी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सोलापूर :  जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांचेमार्फत शुक्रवार, दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्र. सहायक आयुक्त ह. नलावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हयातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.    मेळाव्यात १० वी१२ वीआय.टी.आय. वेल्डरफिटरडिप्लोमाग्रॅज्युएटऑफिस असिस्टंटपदवीबी.कॉमट्रेनी अशा प्रकारची एकुण १४७० पेक्षा जास्त रिक्तपदे ६ उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचीत केलेली आहेत.

          नोकरी इच्छुक उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रसोलापूर येथे प्रत्यक्ष भेटीद्वारे अथवा ०२१७-२९५०९५६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.