भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने अभिवादन
सोलापूर : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरीनिर्वान दिनी डॉ. आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नुतन जिल्हा अध्यक्ष विजय भांगे यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी रासकम संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे, कार्यालयीन सचिव सटवाजी होटकर, उपाध्यक्ष प्रभाकर माने, सुनिल बोलाबत्तीन, प्रमुख संघटक आशुतोष नाटकर, संघटक राजेंद्र शिंदे, प्रमुख सल्लागार रघुनाथ बनसोडे यांच्यासह मध्यवर्ती संघटनेमधील अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.