ठिकाण: मोगल मार्केट, बुधवार पेठ, पुणे.
दिनांक: २३ ऑक्टोबर २०२३
मंथन फाउंडेशन च्या अध्यक्षा आशा भट्ट ह्यांनी वारांगनांसाठी कधी, कोणी न केलेला आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन ह्या महिलांचा आनंद, उत्साह वाढावा आणि त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी, ह्यासाठी नेहमीच विविधरंगी उत्सव कार्यक्रम घेऊन त्यांच्याबरोबर साजरा करणे हा असतो.
भारतामध्ये नवरात्रीच्या उत्सवात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना नवदुर्गा शक्तीचे पुरस्कार देऊन महिलांचा सन्मान केला जातो.
आजच्या पुढारलेल्या समाजात आजही विविध समाज घटकांना मुख्य सामाजिक प्रवाहात येऊ दिले जात नाही, अन् त्यातला एक वंचित गट म्हणजे ह्या वारांगना ! २३ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा नववा दिवस मंथन फाउंडेशन ने ह्या वारांगनांना सोबत घेऊन पुन्हा एकदा एक आगळा वेगळा भोंडला, गरबा, आणि दांडिया कार्यक्रम वारांगना स्त्री शक्तीच्या जागरचा संदेश देत उत्साहाने साजरा केला.
मंथन फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक कविता सुरवसे ह्यांनी कार्यक्रमाची सुरुवात सर्व वारांगना आणि प्रमुख पाहुणे माधवी भट्ट, उमा वेलणकर ह्यांचे स्वागत करून केले. त्यांनी प्रास्ताविकात, नवरात्रीचे महत्व, भोंडला म्हणजे काय, तो आपण का साजरी करतो, स्त्री शक्तीचे महत्व सांगितले.
पर्जन्य राजाचे आभार मानण्यासाठी म्हणून हस्त नक्षत्र प्रतीक असलेल्या हत्तीची पुजा प्रमुख पाहुण्या माधवी भट्ट, उमा वेलणकर, आशा भट्ट, कविता सुरवसे, आणि वारांगना ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री गणेशाच्या आराधनेने भोंडल्याची सुरुवात 'ऐलमा पैलोमा गणेश देवा', 'माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा' ह्या गीताने करुन आड बाई अढोणी' ह्या गीताने फुगडी खेळत भोंडल्याची सांगता करण्यात आली. त्यानंतर सर्व वारांगनांनी अतिशय उत्साहात, गरबा, आणि दांडिया ह्याचाही आनंद घेत सर्व काही विसरून एकोप्याने ताल धरत नृत्य करीत होते.
वारांगना खिरापत देऊन कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात करण्यात आली. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेला कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक कविता सुरवसे, सारिका पवार, श्रुतिका यादव, सुवर्णा पवार, बाबू शिंदे, सोनाली हांडे, व सर्व पिअर एज्युकेटर्स ने मेहनत घेतली.