निमित्त कोजागिरी पौर्णिमेचं ! कार्य भाविकांना अन्नदानाचं !!

shivrajya patra

सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राची आदी शक्ती तुळजाभवानी मातेच्या दर्शनास पायी निघालेल्या भक्त - भाविकांना तुळजापूर रस्त्यावरील हगलूर येथे बहुजन रयत परिषदेच्या वतीने शुक्रवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

भुकेल्यांना घास आणि निराधारांना आधार, हा ढोबळे कुटुंबीयांचा संस्कार आहे. हा संस्कार तीन पिढ्यांनी जपला आहे. निमित्त कोणतंही असो ! माणसाच्या मुखात दोन समाधानाचे घास गेले पाहिजेत, या उदात्त भावनेतून ढोबळे कुटुंबीय अन्नदान करत असतात. त्याचाच भाग म्हणून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक, वारकरी तुळजापूरला पायी चालत जातात. 

आपल्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी, त्यांच्या मुखात सात्विक अन्नाचा घास पडावा आणि त्या ऊर्जेवर सर्व वारकऱ्यांची पायी वारी सिध्दीस जावी, या भावनेतून आज तुळजापूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांना माजी मंत्री व विद्यमान भाजपा राज्य प्रवक्ते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, त्यांच्या कन्या बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमल अजय साळुंखे यांनी महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
To Top