मराठा आरक्षणाच्या चक्री उपोषणात शिवसेना ठाकरे पक्षाचा सहभाग

shivrajya patra
सोलापूर/२८ ऑक्टोबर : मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रयपंत वानकर, यांच्या उपस्थितीत चक्री उपोषणात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला.

प्रारंभी श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी 'एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही', अशा घोषणा दिल्या. 

यावेळी चक्री उपोषणाचे संयोजक माऊली पवार यांनी आंदोलनाचे पूर्ण प्रास्ताविक केले. शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपुरी,  उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, नूतन जिल्हाप्रमुख अजय दासरी, उपनेते अस्मिता गायकवाड यांनी आपल्या भाषणातून केंद्र व राज्य शासन आरक्षणाबाबत करीत असलेली दिरंगाई व अनास्था यावर सरकारवर जोरदार टीका केली, परत एक संपूर्ण दिवस आंदोलन करण्याचा निर्धार जाहीर केला. 

सदर आंदोलनास अस्मिता गायकवाड, अजय दासरी, विष्णू कारमपुरी, प्रताप चव्हाण, अतुल भवर , दत्तात्रय वानकर, महेश धाराशिवकर, सुरेश जगताप , सोमनाथ शिंदे , संदीप बेळमकर, अनिल दंडगुले , सैदप्पा जंगडेकर, नाना मोरे, सुरेश शिंदे , संजय गवळी, रेवण पुराणिक, विजय पुकाळे, तुषार अवताडे, सुरेश जगताप , अण्णा गवळी, दत्ता गणेशकर, विठ्ठल कुऱ्हाडकर, अनिल दंडगुळे, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, एडवोकेट मुनिनाथ कारमपुरी, रमेश चिलबेरी , आदींनी पाठिंबा देण्यास सामील झाले होते.
To Top