बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचा निर्णय
सोलापूर : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात मंगळवारी तातडीची बैठक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त कमिटीचे मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत बुधवारी, दि ०१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भीमसैनिकांच्या वतीने मराठा समाजाने आरक्षण संदर्भात ज्या मागण्या मांडल्या आहेत, त्यास पाठिंबा दर्शविण्यासाठी मानवी साखळीची आयोजन करण्यात आलंय.
या मागण्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी सर्व भीमसैनिक यांच्या वतीने मानवी साखळी पद्धतीचे आंदोलन करण्यात येणार आहे, तरी सोलापूरकरांनी व भीम सैनिकांनी उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात आलंय.