हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची प्रारुप यादी सोमवारी, २५ सप्टेंबर २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार कार्यालयात तपासणीसाठी ही यादी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
प्रारुप यादी जिल्ह्याच्या www.solapur.gov.in या संकेतस्थळावरही तपासणीसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मतदान केंद्राच्या प्रारुप यादीवरील हरकती व सूचना प्रारुप यादी प्रसिध्द झाल्यापासून ०७ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांच्याकडे दाखल करता येतील, असेही पत्रकात नमूद आहे.