" काम " च्या शाखा अध्यक्षपदी रवी ताकपेरे डॉ. सुरेश खमितकर यांची सचिवपदी निवड

shivrajya patra
सोलापूर : कराओके आर्टिस्ट असोशिएशन आँफ म्युझिक (रजि.) अर्थात " काम " चे मुख्य कार्यालय पुणे येथे असून त्याची सोलापूर शाखा मागील  दोन वर्षांपासून कार्यरत आहे. सोलापूरच्या नवोदित गायक व गायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. 
"काम " संस्थेच्या सोलापूर शाखेची बैठक रविवारी, २४ सप्टेंबर रोजी अध्यक्ष रवी ताकपेरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 


"काम" च्या सोलापूर शाखेच्या उपाध्यक्षपदी रवि गायकवाड, सचिव डॉ. सुरेश खमितकर, खजिनदार वेणूगोपाळ उत्तूर, सहसचिव अभिमन्यू लोंढे, प्रसिद्धी प्रमुख व संघटक डॉ. संजय मुरुमकर, महिला संघटक श्रीमती संगीता कोळी, संघटक नरेश अरसिध्द यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. या बैठकीत सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी
आपले मनोगत व्यक्त केले. 

तन,मन,धनाने एकत्र येऊन " काम " साठी कार्य करण्याचा मनोदय जाहीर केला. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. भविष्यात "काम" च्या प्रगतीसाठी व नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त चर्चा करण्यात आली.
To Top