सोलापूर : येथील भवानी पेठ, घोंगडे वस्ती परिसरातील दिलखुश मित्र मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही परमपूज्य श्री अभिनव सिद्धारूढ महास्वामीजी आणि परमपूज्य सुशांता माताजी यांच्या दिव्य सानिध्यात महास्वामीजींचे प्रवचन कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
प्रारंभी परमपूज्य श्री अभिनव सिद्धारूढ महास्वामीजी व सुशांता माताजी यांच्या दिव्य सानिध्यात श्रींची पूजा होऊन महाआरती करण्यात आले.तदनंतर महास्वामीजींचे प्रवचन कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, सिद्रारामय्या पुराणिक, बंडाप्पा डोळे, बसवराज जाटगल, बाबुराव जमादार, नरसप्पा पुजारी, नरसप्पा मंदकल, सायबण्णा मुडल,माळप्पा करली, नुरू नालवार, राजकुमार पाटील, उत्सव अध्यक्ष गंगाराम डोळे, बालाजी गुज्जा, गंगाराम कोळी, बिपिन पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसाद पूजनाने महाप्रसाद वाटप करण्यात आले.
भक्तीमय व मंगलमय वातावरणात विजयपूरचे परमपूज्य श्री अभिनव सिद्धारूढ महास्वामीजी व सुशांता माता यांचे प्रवचन कार्यक्रमासाठी या परिसरातील महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी अण्णाराव बिराजदार यांच्या वतीनं सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राघवेंद्र बदल, गणेश वंगा, मल्लिकार्जुन करली, धनंजय पुराणिक, अंबादास कन्ना, अशोक पंदीला, अंबादास कोळी, प्रभाकर बदल, सिद्राम डोळे, नागेश डोळे, सिद्धेश्वर डोळे, संतोष कोळी, विजय कोळी, मल्लू कोळी, व्यंकटेश पंदीला कुमार शिरसीकर, राहुल संकाराम, प्रवीण डोळे, महेश पाटील, सिद्राम मंदकल, देवराज पाटील, अफसर नालवार, रवी मंदकल, पवन तगारे, संतोष करली यांच्यासह दिल खुश मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्तांनी परिश्रम घेतले दरम्यान या परिसरातील हजारो भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.