प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

shivrajya patra
सोलापूर : पूर्व विभाग सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बारा बलुतेदार यांच्याकरिता आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने आणलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मार्गदर्शन शिबीराचे आयोजन सोमवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता पूर्व विभाग वाचनालय कन्ना चौक, सोलापूर येथे   आयोजित करण्यात आले आहे. खालील लाभ घेण्यास पात्र असलेल्या लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष संजय साळुंखे, सचिव अक्षय अंजिखाने यांनी केले आहे.


या मार्गदर्शन शिबिरासाठी समीर माढेकर (सूक्ष्म, मध्यम, लघु कर्ज विभाग, बँक ऑफ इंडिया) व जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. योजनेस पात्र लाभार्थी सुतार, न्हावी, होड्या बनविणारे, लोहार, कुलूप बनविणारे, हातोडा व टुलकीट बनविणारे, सोनार, कुंभार, मूर्तिकार, चांभार, मेस्त्री, चटई व झाडू बनविणारे, पारंपरिक बाहुल्या व खेळणी बनविणारे, हार बनविणारे वरील व्यवसाय करणारे सर्व व्यवसायिक या योजनेकरिता लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १ लाख व दुसऱ्या टप्प्यात २ लाख वार्षिक ५ टक्के इतक्या माफक व्याजदराने मिळणार आहे.  


या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती या शिबिरात देण्यात येणार आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबीराचा लाभ घ्यावा, अशी विनंती महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. 
To Top