सांगशील का माय ? भिडेवाड्याकडे पाठ करून कुठं निघाला आहे हा थवा...??

shivrajya patra
गुलामीचं गौरवीकरण होताना
बंधनांना प्रतिष्ठा प्राप्त होताना
पराभवांचे उत्सव साजरे होताना
अपमानांचे उदात्तीकरण होताना
तुझ्या काचेरी डोळ्यांत धूळफेक करणाऱ्यांचा 
कसा ध्यानात येईना झालाय कावा
सांगशील का माय?
भिडेवाड्याकडे पाठ करून कुठं निघाला आहे हा थवा...??

तुझ्या मेंदूत ज्ञानाच्या ज्योती उजळवण्यासाठी
भिडेवाड्यात येताना जिणे झेलले होते अंगावर शेण दगड गोटे
होय त्या सावित्रीनेच स्त्रीमुक्तीचे स्वप्न पाहिले होते मोठे
जिने अंधाराच्या निरंकुश साम्राज्याला लावली होती एकदाची चुड
जिने गाडले होते संस्कृतीच्या उरावर बसलेले मनुवादाचे धूड
शिकून सवरून ही त्या मनुशी तुझी कधी झाली युती हे कळलंच न्हाई कवा...
सांगशील का माय?
भिडेवाड्याकडे पाठ करून कुठं निघाला आहे हा थवा...??

अशी कशी विस्मृतीत गेली सावित्री जिने मुक्तीचा मार्ग दावला व्हता नवा...
सांगशील का माय?
सांगशील का??

सत्यशोधक ✍️सचिन माळी
  (वंचित बहुजन आघाडी चे नेते)
Sachin Mali
Shahir, Navayan Mahajalsa

त्या छायाचित्रावर स्मिता आपटे यांनी त्यांचं मत मांडलंय.

त्यांनी मांडलेल्या मतावर नेटकरी बरे झाले, आपण बोललात आम्ही बोललो असतो तर भावना दुखावल्या असत्या, असंही म्हटलंय.
To Top