कासेगाव/संजय पवार :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर चा ९ वा बाॅयलर अग्निप्रदिपन प्रज्वलन सोहळा मंगळवारी, ०९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व सौ. शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक शहाजी पवार, गोकुळ शुगर चे संस्थापक अध्यक्ष बलभीम शिंदे, तुळजाभवानी साखर कारखाना चेअरमन सुनील चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित आहेत. या प्रसंगी गोकुळ शुगर चे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर प्रदिप पवार, सिनियर मॅनेजर बालाजी पाटील, वर्कर्स मॅनेजर राजकुमार लवटे, शेती अधिकारी फक्रुदिन जहागीरदार, प्रोसेसिंग मॅनेजर एस.पी. भावसार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास तमाम शेतकरी बंधू आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे,
असे आवाहन चेअरमन शिंदे यांनी केले.
गत हंगामात गोकुळ शुगर ला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचं आर्थिक होणार नाही, याची खबरदारी घेऊन त्या सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी विलंब न होऊ देता, त्वरीत बिले दिली होती. हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा होता अन् गाळप हंगाम यशस्वी केला होता. तोच विश्वास कायम ठेऊन आजही शेतकऱ्यांनी आपला ऊस गोकुळला पाठवून सहकार्य व विश्वास सार्थ ठरवावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.