कासेगाव/संजय पवार
सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक, मंडळाच्या जिल्हास्तरीय बैठकीत नूतन अध्यक्षपदी संजय रामचंद्र जवंजाळ (हर्षवर्धन हायस्कूल, तळे हिप्परगे) तर जब्बार कासीम शिकलगार (श्रीनाथ विद्यालय सोनके, तालुका पंढरपूर) यांची जिल्हा सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाची जिल्हास्तरीय बैठक रविवारी, १० सप्टेंबर रोजी शिवाजी प्रशाला, सोलापूर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी विज्ञान मंडळाची जिल्हा कार्यकारणी राज्य संचालक लक्ष्मी प्रसाद मोहिते यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. माजी जिल्हा सचिव श्रीमती प्रियंका सतीश आराधे व शिवाजी चापले सर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल उभयतांचा सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.
याप्रसंगी राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते, माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी चापले, माजी सचिव श्रीमती आराधे मॅडम, नीलकंठ लिंगे (सांगोला), चंद्रकांत भाऊसाहेब पाटील (बार्शी), अमोल नामदेव देशमुख, संदीप नारायण नलावडे, समीर बाबूलाल माळी, सोलापूर शहर जाधव, नूर अहमद कारंजे, सोलापूर शहराध्यक्ष चंद्रकांत लिंबाजी कुंभार ,मोरेश्वर काटवे, सौ. गायत्री कटारे, श्रीमती कुनाळे, संध्या सौ. संगीता रेळेकर आदी विज्ञान शिक्षक उपस्थित होते.