राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कार समारंभ थाटात संपन्न
सोलापूर :भारत देशाचे वैभव नष्ट करणाऱ्या ब्राम्हणशाहीला पराभूत करा, असे आवाहन करून भारतीय प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीचे प्रवर्तक भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी मोदी शासनावर घणाघाती टीका करताना, "संविधान बचाव, मोदी हटाव" "संविधान बचाव, ई. व्ही. एम. हटाव" असा नारा दिला. संविधानाच्या संरक्षणासाठी सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी भाजपाच्या धर्मांध शासनाला पराभूत करा, असे जाहीर आवाहन केले.
प्रबुद्ध रंगभूमी आयोजित अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कार वितरण समारंभात, भारतीय प्रबुद्ध रंगभूमी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबुद्ध साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष यू. एफ. जानराव हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात, फुले शाहू आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व तथागतांच्या मूर्तीसमोर द्वीप प्रज्वलनाने करण्यात आली. तद्नंतर विशाखा उबाळे यांनी सामुदायिक बुद्धवंदना घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. किर्तीपाल गायकवाड यांनी केले.
यावेळी भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कार, डॉ. सुहास सरवदे (प्रबुद्ध चित्रकार), डॉ. औदुंबर म्हस्के (प्रबुद्ध अभिनेते), डॉ.उत्तम कांबळे (प्रबुद्ध संशोधक), डॉ. सुनील रामटेके (प्रबुद्ध नाटककार), शंकरराव तायडे (प्रबुद्ध क्रंतीनायक), भीमशाहीर रामचंद्र जानराव (प्रबुद्ध गीतकार) या पुरस्काराने पुरस्कार विजेत्यांना टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र, पंचशील, आभूषण व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रबुद्ध नाट्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सायरे यांनी, 'मी संविधान बोलतोय' हे प्रबुद्ध नाट्य बाबासाहेबांच्या भूमिकेत अत्यंत प्रभावीपणे सादर केले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास शिंदे, हरिश्चंद्र डहाट (बँगलोर), प्रा.गुलाब जगताप (बीड), डॉ.कुमार लोंढे (अकलूज), मिलिंद कांबळे, गुरुजी (बिदर), दत्ता गायकवाड, बाळासाहेब सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व विजेत्यांनी पुरस्कारार्थीनी यावेळी आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत समर्पक शब्दात प्रबुद्ध साहित्य परिषदेचे शहर अध्यक्ष कल्याण श्रावस्ती यांनी केले. सर्व पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष फारुख शेख, कार्याध्यक्ष अक्षय बबलाद, संयोजक डॉ. किर्तीपाल गायकवाड, भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर पी आय च्यावतीने दत्ता वाघमारे यांनी व प्रबुद्ध नाट्य परिषदेच्यावतीने रामजी गायकवाड यांनी भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांचा विशेष सत्कार केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत ताकपेरे, अशोक साबळे, श्रीशैल रणधिरे, ॲड. राजरत्न जानराव, प्रबुद्ध गायकवाड, रोहित घोडके, इमामहुसेन शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या समारंभास जेष्ठ पत्रकार तथा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, शिल्पकार डी. डी. रामपुरे, अभिनेते मिलिंद ताकपेरे, अभिनेत्री मंगल नागमोडे, अभिनेत्री प्रेरणा मैंदर्गिकर, अभिनेते आशुतोष नाटकर, ॲड. अखिल शाक्य, शैलेंद्र सरवदे, प्रा. जीवन शिंदे, प्रा. क्षितिजा गायकवाड, कलावती गायकवाड, अंजली साबळे, डी. डी. पांढरे, शाक्य संघाचे अशोक दिलपाक, माजी डी वाय एस पी विजय परकाळे, भैयाजी बाबर, विश्वास गायकवाड, अभिनेत्री सावित्री बनपुरकर, मिलिंद ठोंबरे यांच्यासह सर्व क्षेत्रातील रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.