........त्यांच्या मागण्या मान्य करुन सकल मराठा समाजास द्यावा न्याय : महिला आघाडीची मागणी

shivrajya patra

सोलापूर : महोदय, आज त्या उपोषणास १४ दिवस झाले. मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करुन सकल मराठा समाजास न्याय देण्यात द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पल्लवी सुरवसे यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली.
मराठा आरक्षणासबंधी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण केल्यामुळे संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. संबंध महाराष्ट्राची जनता त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी ही मराठा आरक्षणास मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन जाहिर पाठिबा दर्शविला आहे. शहर सोलापूर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जरांगे-पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे.

यावेळी अध्यक्ष पल्लवी सुरवसे, आशालता आव्हाड, सविता कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या रेखा थोरात, विशाखा उबाळे, सामाजिक कार्यकर्त्या निर्मला शेळवणे, लक्ष्मीबाई माने, मनिषा नलवडे, सामाजिक कार्यकर्त्या नुसरत शेख आणि सामाजिक कार्यकर्त्या रेशमा मुल्ला उपस्थित होत्या.

वंचित बहुजन महिला आघाडीच्या महिलांनी मराठा आरक्षणास पाठिंबा दिला. सर्व जाती-धर्माचे लोक पाठिंबा द्यायला लागलेत, पण सरकारला अद्याप जाग आली नसल्याची भावना सौ. सुरवसे यांनी यावेळी व्यक्त केली.
To Top