सोलापूर : तेलंगणा चे मुख्यमंत्री केसीआर यांनी दशरथ गोप यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून गोप यांच्यावर सोलापूर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. केसीआर यांनी मंगळवारी दशरथ गोप यांच्या निवडीचे पत्र जाहीर केले.
या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अध्यक्ष पद दिल्याबद्दल मुख्यमंत्री केसीआर यांचे प्रारंभी आभार व्यक्त केले. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन आपण सोलापूरच्या विकासासाठी काम करणार असून तेलंगणा पॅटर्न सोलापुरात राबविण्यासाठी आपण बीआरएस च्या माध्यमातून पूर्ण निष्ठेने प्रयत्न करणार आहे. सोलापूरात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही दशरथ गोप यांनी शेवटी म्हटले.