मोहम्मद अयाज 'भारत भूषण' पुरस्काराने सन्मानित !

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर सूरमणी आणि महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज यांना 'भारत भूषण' राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  मुंबई येथील मेयर सभागृहात आयोजित पुरस्कार सोहळ्यात सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्यात मंद्रुपचे सुपुत्र मोहम्मद अयाज यांचाही समावेश होता, हे सोलापूर जिल्ह्यासाठी गौरवाचं आहे.

माणसाच्या अंगी प्रबळ इच्छा शक्ती जर असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य राहात नाही . मोहम्मद अयाज यांच्पा बाबतीत देखील असंच काहीसं आहे. मंद्रुपपासून ते मलेशिया, सिंगापूर, दुबई आफ्रिका, सौदी अरेबिया सारख्या देशात जाऊन आपली कला सादर करून सोलापूरचं नांव सांस्कृतिक क्षेत्रात लौकिक केले. 

सिध्दरामेश्वर भजन, आई तुळजाईचा गोंधळ , स्वामी समर्थ महीमा, देश भक्ती, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, अशा देवी-देवता आणि महापुरुषांवर आधारित अनेक ध्वनिचित्रफीतीतून मोहम्मद अयाज यांनी आपली सेवा बजावली आहे.

आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपणारे अयाज हे एकलव्य गायक असून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. शेतकरी कलावंताचा भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

'हा पुरस्कार माझा नसून माझ्यावर प्रेम दाखवणाऱ्या रसिक, माय-बाबांचा आहे, हा पुरस्कार सोलापूरकरांना समर्पित करतो,' अशी भावना मोहम्मद अयाज यांनी व्यक्त केली.

छायाचित्रात : ज्येष्ठ अभिनेते अली खान, अविनाश जी सिएमङी हुमन राईट्स, संजीवकुमार, राजेश श्रीवास्तव, पुरस्कार प्राप्त मोहम्मद अयाज छायाचित्रात दिसत आहेत.

To Top