संभाजी ब्रिगेड एकत्रीकरणानिमित्त शनिवारी आनंदोत्सव सोहळा

shivrajya patra

सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ शनिवारी, 30 मे रोजी दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्रित आल्याप्रित्यर्थ फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये दोन्ही संभाजी ब्रिगेड , मराठा सेवा संघ यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत या आनंदोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.

सामुहिक जिजाऊ वंदनाने सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील हे दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्रित करण्यासंदर्भात आपले विचार व्यक्त करतील. 

त्यानंतर ऐतिहासिक कामगिरी करणारे प्रदीप कणसे, हर्षवर्धन मगदूम या शिवक्रांतीवीरांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि  33 कक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली.

25, मे रोजी पुणे येथे दोन्ही संभाजी ब्रिगेड चे नेते प्रवीण गायकवाड आणि मनोज आखरे यांनी युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याची घोषणा केली होती.

To Top