15, 72, 50, 000 रुपयांची फसवणूक; शिंदे कंपनीविरूध्द गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : गोकुळ शुगर इंडिस्ट्रिज लिमीटेडच्या दिवाळखोरी प्रकरणामध्ये झालेले अंतिम आदेश लपवून, शिंदे भावंडांनी परप्रांतीय कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही बाब लपवून ठेवत राजगोपालन रामस्वामी यांच्या कंपनीसोबत करार करुन बी हेवी मॉलासेस पुरवठ्याच्या नावाखाली 15, 72, 50, 000 रुपयांची अॅडव्हास घेऊन रामास्वामी यांची फसवणूक केलीय. हा प्रकार सप्टेंबर 2024 ते आजमिती दरम्यान घडलीय. याप्रकरणी डायरेक्टर गणपत दत्ता शिंदे यांच्यासह शिंदे कंपनीतील चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॅनेजींग डायरेक्टर दत्ता बलभिम शिंदे, डायरेक्टर विशाल गणपत शिंदे आणि सी एफ ओ कपील बलभिम शिंदे (रा. गोकुळ साखर कारखाना, धोत्री, तालुका दक्षिण सोलापूर) अशी अन्य आरोपींची नांवे आहेत. या चौकडीविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राजगोपालन रामस्वामी यांच्या इ.आय. डी. पॅरी इंडिया लि. चेन्नई या कंपनीसोबत गोकुळ साखर कारखान्याच्या शिंदे कंपनीनं मोहनदास छत्तराम यांचे  33 कोटी रुपये गोकुळ शुगर इंडस्ट्रिज लिमीटेड, सोलापूर यांना देणे असून याबाबत एनसीएलटी मुंबई बेंन्च १, यांच्याकडे दि. 27 जून 2024 अन्वये मोहनदास छत्तराम विरुध्द गोकुळ शुगर इंडिस्ट्रिज लिमीटेडच्या दिवाळखोरी प्रकरणामध्ये झालेले अंतिम आदेश दिले होते.

ही बाब लपवून ठेऊन रामास्वामी यांच्याकडून मॉलासेस खरेदीपोटी 15, 72, 50, 000 रुपयांची अॅडव्हान्स रक्कम ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँकेचे गोकुळ साखर कारखान्याचे अकाऊंटवर आरटीजीएसने घेतली. त्यानंतर त्या कंपनीस शिंदे कंपनीने रामस्वामी यांच्या इ.आय. डी. पॅरी इंडिया लि. चेन्नई या कंपनीसोबत झालेल्या कराराप्रमाणे मालाचा पुरवठा न करता तसेच अॅडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कम सुध्दा परत न करता, गोकुळ साखर कारखान्याचे खात्यावरुन चौघांनी संगणमत करुन गणपत दत्ता शिंदे यांनी पत्नीचे खात्यावर तसेच त्यांच्या युवा गारमेंटचे कापड दुकानाचे खात्यावर सदर रक्कम घेतली. 

शिंदे परिवारातील चौघांनी सुरुवातीपासुनच फसवणुकीच्या हेतुने खोटी आश्वासने देऊन, साखर कारखाना सक्षम असल्याचा खोटा आभास निर्माण करुन, रामास्वामी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, बी हेवी मॉलासेस व सी हेवी मॉलासेस हा माल पुरवठा करण्याकरीता रामास्वामी यांच्या कंपनी सोबत करार करुन  कंपनीकडून मोठी रक्कम संगणमत करुन घेतली. 

त्यानंतर ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे फिर्यादीचे कंपनीस कोणत्याही प्रकारचा माल पुरवठा केला नाही. तसेच फिर्यादीची फसवणूक करण्याचे उद्देशाने पुढील तारखेचे अकाऊंट मध्ये बॅलन्स नसलेले चेक देऊन फिर्यादीचे इ.आय.डी पॅरी इंडिया लि., चेन्नई या कंपनीची फसवणूक केली. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा सपोनि काळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top