कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत शासनाविरुद्ध तीव्र लढा करणार : राजा सोनकांबळे

shivrajya patra

सोलापूर : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाने आदेशित केलेनुसार मंगळवारी, 21 एप्रिलपासून महाराष्ट्र राज्यासह सोलापूर शहर जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या संपाचा आज चौथा दिवस होता. या संपाची अधिक तीव्रता वाढवून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्य कामगार विमा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासन जोपर्यंत आपल्या मागण्याची पूर्तता पुर्ण करीत नाहीत. तोपर्यंत त्यांच्या विरोधात बेमुदत संपाच्या रूपाने संघर्ष करून  मागण्या मान्य करण्यास भाग पाडू, यासाठी आपण सर्व कर्मचाऱ्यांनी या संपामध्ये संपूर्ण ताकतीनिशी सहभाग घ्यावा, असे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर शहर जिल्ह्याचे सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी व्यक्त केले. 

शुक्रवारी, सकाळी 10-30 वा. राज्य कामगार विमा रुग्णालया च्या आवारामध्ये झालेल्या गेट सभेमध्ये कर्मचाऱ्यांना उद्देशात्मक बोलत होते. या गेट मिटींगच्या अध्यक्षस्थानी राज्य कामगार विमा रुग्णालयातील ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रासकम संघटनेचे ज्येष्ठ नेते सटवाजी होटकर आणि ज्येष्ठ नेते आशुतोष नाटकर होते. 

यावेळी राज्य कामगार विमा रुग्णालयातील वर्ग-3 चे कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन शासनाच्या निषेधपर घोषणा देत होत्या.

To Top