सोलापूर : हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड संस्थेच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार 2026' साठी राज्यात विविध क्षेत्रात कार्यरत अन् उल्लेखनिय कामगिरी केलेल्या कर्तुत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात येतोय, हा गौरव सोहळा महाराष्ट्र दिनी शुक्रवारी, 01 मे रोजी सकाळी 11 वाजता सांगली येथील नियोजन भवन, कलानगर, गोल्ड पार्क, महादेव नगर रोड येथे (पेट्रोल पंपाच्या मागे) पार पडतोय.
माजी मुख्यमंत्री पद्मभूषण स्व. वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या 'राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार 2026' साठी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने प्रस्ताव मागवण्यात आले होते. संस्थेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार तसेच त्यांच्या बहुमोल योगदानाची दखल घेऊन निवड समितीने राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार 2026' साठी नांवे निश्चित केली.
या पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती मध्ये सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार सलाउद्दीन शेख यांचाही समावेश आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, जनजागृती करणे आणि समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे या कार्याची दखल घेऊन सलाउद्दीन शेख यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती जयश्री मदन पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन सांगली-मिरजचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच कैलास पाटील, अतुल माने, शाहीन शेख, श्रीमती वर्षा अमर निंबाळकर, महेश धोत्रे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयंतराव घोरपडे कार्य पाहत आहेत. राज्याचे बांधकाम मंत्री शिवाजीराव नाईक या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील, असंही संयोजकांनी सांगितलंय.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील किमान 05 ते 10 मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये सोलापूर शहरातील वरिष्ठ पत्रकार सलाउद्दीन शेख यांना “सामाजिक आदर्श पत्रकार पुरस्कार” जाहीर झाला आहे, ही सोलापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण मानला जातोय.
या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असं आवाहन हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था, कराड चे अध्यक्ष डॉ. सुनिल फडतरे यांनी केलं आहे.

