विशेष ... ! महिलांसाठी “पिंक ई-रिक्षा योजना” – रोजगार व स्वावलंबनाचा नवा मार्ग

shivrajya patra

सोलापूर : राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, प्रवासात सुरक्षितता वाढविणे आणि स्वावलंबन साध्य करणे या उद्देशाने “पिंक ई-रिक्षा योजना” राबविण्यात येत आहे.

योजनेचे फायदे :
- महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
- आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळेल.
- प्रवास करताना सुरक्षिततेची हमी मिळेल.
- उच्च शिक्षणानंतर रोजगार मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल.

योजनेचे स्वरूप व आर्थिक सहाय्य :
- योजनेतील पात्र महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा एजन्सीची माहिती दिली जाईल.
- ई-रिक्षा खरेदीमध्ये सर्व करांचा (GST, नोंदणी, रोड टॅक्स) समावेश असेल.
- सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडून 70 टक्के कर्ज उपलब्ध होईल.
- लाभार्थी महिलांना 10 टक्के आर्थिक भार उचलावा लागेल.
- योजनेत 21 ते 40 वर्षांपर्यंतच्या महिलांचा समावेश असेल.
- ई-रिक्षा चालविण्यासाठी प्रशिक्षण, परवाना, गणवेश व ओळखपत्र दिले जाईल.

विशेष बाबी :
- महिलांना पाच वर्षांच्या कालावधीत कर्जाची सुविधा मिळेल.
- प्रशिक्षणानंतर महिलांना ई-रिक्षा चालविण्याचा परवाना दिला जाईल.
- प्रवासात सुरक्षिततेसाठी पिंक ई-रिक्षा उपयुक्त ठरेल.

संपर्क:
महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर.                                                                                   जिल्हा माहिती कार्यालय,                                     सोलापूर.

000000

To Top