एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनाचा आदर्श शाळा पुरस्कार डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूलला प्रदान

shivrajya patra

सोलापूर : एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्यच्यावतीने डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सोलापूर या संस्थेला “आदर्श शाळा” पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सोलापूरचे प्राचार्य मोहम्मद साकिब सय्यद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

हा पुरस्कार शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय केल्यामुळे हा शाळेची निवड करण्यात आली. 

यावेळी शाळेचे शिक्षक अब्दुल रहमान शेख उपस्थित होते. हा पुरस्कार शाळेच्या शैक्षणिक कार्याला अधिक प्रेरणा मिळणार असून भविष्यातही उत्कृष्ट कार्य करण्याची ग्वाही प्राचार्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण-डोंबिवली खासदार श्रीकांत शिंदे,  सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख तथा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, सांगलीचे माजी खासदार चंद्रहार  पाटील,  नूतन राज्यसभा खासदार ज्योतीताई वाघमारे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष बापूसाहेब अडसूळ, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राज्य प्रवक्ता तथा शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष व माजी सिनेट सदस्य एजाज शेख, खरात सर,  वैभव शेटे,  दाजी चौघुले,  जूबेर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

हे पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. असदुल्लाह खान तसेच विश्वस्त सादुल्लाह खान आणि इबादुल्लाह खान यांनी प्राचार्य व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

To Top