ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर

shivrajya patra
सोलापूर/09 : जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील अचकदाणी, आगलावेवाडी, अजनाळे, अकोला, आलेगाव, बामणी, भोपसेवाडी, बुद्धेहाळ, बुरंगेवाडी, चोपडी, देवळे, धायटी, डिकसळ, डोंगरगाव, एखतपूर, गायगव्हाण, घेरडी, गौडवाडी, मंगेवाडी (ह.), हलदहिवडी, हंगीरगे, हणमंतगाव, हातीद, इटकी, जवळा, जुजारपूर, जुनोनी, कडलास, कमलापूर, कटफळ, खिलारवाडी, किडबिसरी, कोळे, लक्ष्मीनगर, लोणविरे, लोटेवाडी, महिम, महूद बु., मानेगाव, मांजरी, मेडशिंगी, मेथवडे, नराळे, नाझरे, निजामपूर, पाचेगाव बु., पारे, राजुरी, संगेवाडी, शिरभावी, सोमेवाडी, तरंगेवाडी, तीप्पेहळी, उदनवाडी, वझरे, शिवणे, वाकी घेरडी, वाणी चिंचाळे, वासूद, वाटंबरे, मंगेवाडी (य.) व बुरलेवाडी अशा एकूण 62 ग्रामपंचायतींसाठी प्रारूप प्रभाग रचना (नमुना ‘ब’) तयार करण्यात आलेली आहे.

ही प्रारूप प्रभाग रचना संबंधित ग्रामपंचायतींच्या तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथे नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने हरकती व सूचना सादर करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना तहसिलदार यांच्याकडे समक्ष सादर करण्याची अंतिम मुदत : 13 एप्रिल 2026 प्राप्त हरकती व सूचना दिनांक 16 एप्रिल 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी सादर करण्यात येतील. 

उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग यांच्याकडे सुनावणी दिनांक : 21 एप्रिल 2026 तरी संबंधित ग्रामपंचायतीतील नागरिकांनी प्रारूप प्रभाग रचना पाहून आपापल्या हरकती व सूचना निर्धारित मुदतीत सादर कराव्यात, असं आवाहन सांगोला तहसिलदार श्रीमती बाळुताई भागवत यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****
To Top