आशाताईंना निरोप... ! 'माझी आई गेल्याचे दु:ख' : मोहम्मद आयाज

shivrajya patra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवारांसह महागायक विजेते मोहम्मद आयाजसह अनेक मान्यवरांची उपस्थिती 


मुंबई : पद्मभूषण आशा भोसले पंचत्वात विलीन झाल्या. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, छगन भुजबळ, शंभूराजे भोसले, संजय सिरसाट, भारत रत्न सचिन तेंडूलकर,  सुपरस्टार आमिर खान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, भजन सम्राट अनुप जलोटा, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले, हरिहरन, शान, पद्मिनी कोल्हापुरी, पूनम ढिल्लो, तब्बू , विवेक ओबेरॉय, अर्जुन कपूर, महाराष्ट्राचे महागायक विजेते तथा सोलापूर सूरमणी मोहम्मद आयाज यांच्यसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आशाताईं यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. 
याप्रसंगी अश्रू नयनांनी 'अमर रहे अमर रहे, आशाताई अमर रहे च्या घोषणा देत आशाताईंना निरोप दिला. गेली अनेक वर्ष आशाताई यांच्या सहवासात असलेले सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांनी माझी आई गेल्याचे दु:ख व्यक्त केले.

फोटोमध्ये : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मनसेचे राज ठाकरे सुपरस्टार आमिर खान, गायक मोहम्मद अयाजसह अन्य मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.
To Top