रणसम्राट सामाजिक संस्थेच्या वतीने 'रणसम्राट युवारत्न पुरस्कार 2026' चं वितरण

shivrajya patra

सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने रणसम्राट संस्थेच्या वतीने शनिवारी 'रणसम्राट युवारत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. 

यावेळी ज्येष्ट विधिज्ञ विजय मराठे, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, सोलापूर बार असोसिएशन चे अध्यक्ष अॅड बाबासाहेब जाधव यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

या गौरव सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, विधी, कला, आरोग्य, पत्रकार, पोलीस दल आदी  क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे युवारत्न यांचा सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन कपिल भालेराव यांच्यामार्फत करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचं स्वागत व सत्कार संस्थेचे वतीने करण्यात आला. 

सोहळ्याचं प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष दिपक गायगवळी यांनी केले. यावेळी अमोल बापू शिंदे, प्रियंदर्शन साठे. अॅड. मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपल्या नावीन्यपूर्ण शैलीत आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व त्यांनी केलेले कार्य व देशाप्रतिचं बाबासाहेब यांचे योगदान याचे विस्तृत माहिती मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदपाठक यांनी केले तर गिरीश उडानशिव यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव मिलिंद ठोंबरे, राजू माने, अॅड. सतीश गायकवाड, प्रमोद मसलखांब, कपिल भालेराव, संजय कांबळे, विलास दुपारगुडे, मलिक शिंदे, विजय वाघमोडे, अविनाश दुणगे, राघू नांदवर, अप्पू पाटील, गौतम साबळे, अरविंद महाले, अॅड माळसिद्ध देशमुख, भीमा गायगवळी, अश्विनी शिंगे आणि हर्षराज बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

To Top