पुणे : येथील गंजपेठ असणारे ऐतिहासिक फुले वाड्यात, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंत्ती निमित्त सावित्रीमाई फुले यांना राज्यसभा खासदार आयुष्यमती डॉ. ज्योती वाघमारे आणि पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर आयु. परशुराम वाडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन नियोजित "शाक्य संघ" सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी सामाजिक बजुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र राज्य, नियोजित "शाक्य संघ" माता रमाई महिला बिग्रेड, सेवानिवृत्त महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पत्नी व सेवेत असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पत्नी महाराष्ट्र राज्य, नियोजित "शाक्य संघ" माता सावित्रीमाई फुले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी वाद्यपथक संभाजीनगर व यशसिध्दी आजी-माजी सैनिक वेल्फअर असोसिएशन युनिट पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तीक विद्यमाने प्रथमच विशेष ड्रेसकोडमध्ये वाद्य वाजवून सलामी देण्यात आली.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले की जय, सावित्रीमाई फुले की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माता जिजाऊ यांचा विजय असो, माता रमाई यांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराज की जय, अशा महापुरुषांच्या नांवाने गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना, आयु. अशोककुमार दिलपाक (संघटक, सल्लागार महाराष्ट्र राज्य) यांनी असे सांगितले की, नियोजित "शाक्य संघ" सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेचे रोपटे प्रथम सोलापूरमध्ये सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वाच्या सहकार्याने सन 2022 मध्ये लावले होते. पोलीस सेवेत असताना, सामाजिक काम करण्याची आवड होती. परंतु सेवेत काही शासकीय बंधने असल्याने सामाजिक काम करता येत नव्हते.
यासाठी सेवानिवृत्तीनंतर समाजाचे आपण काही तर देणे आहोत, म्हणून आम्ही सामाजिक कामाकरिता संगठन केले आहे. त्याचे आठ जिल्ह्यात रजिस्ट्रेशन झालेले आहे व सर्व महापुरुषांना आम्ही विशेष ड्रेसकोडमध्ये त्यांच्या जयंत्तीदिनी मान वंदना देत असतो.
त्याचबरोबर पोलीसांच्या अडी-अडचणी संदर्भात वरिष्ठांना निवेदन देण्याचे काम करीत असतो. सेवानिवृत्त पोलीसांच्या अडी-अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. संपूर्ण महाराष्ट्रभर नियोजित "शाक्य संघ" सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संगठन करुन सामाजिक कार्य अधिक मोठ्या प्रमाणात करण्याचा आमचा मानस असल्याची त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आयु. अशोककुमार दिलपाक (संघटक सल्लागार, महाराष्ट्र राज्य), आयु. अरुण ओहळ (अध्यक्ष, शाक्य मिलिंद संघ दौंड), कारभारी खंडीझोड, नारायण भुजंगराव गायकवाड, सुर्यकांत कांबळे, राजू संसारी, अशोक काळे, शशिकांत डाळींबे, राजू नाईकनवरे, दत्तात्रेय घोडके, राहूल आढाव, नरेंद्र निकाळजे, सर्जेराव ओव्हळ, बौध्द उपासिका सौ. सागरबाई ओहळ, सौ. कविता काळे, सौ. प्रमिला आढाव, सौ. हेमलता संसारे, सौ. आशा निकाळजे, सौ. नंदा लोंढे, सौ.मंदा कांबळे (सर्व रा.दौंड), अंकुश पंडीत, रमेश गायकवाड, भगवान वाहुळे, अनिल तांदळे, अशोक गायकवाड, रतन बोर्डे, निवृत्ती सुरडकर, अंकुश पंडीत (सर्व रा. संभाजीनगर), सुभाष सर्वगोड (अध्यक्ष, शाक्य शौर्य विजयस्तंभ, पुणे), गोविंद जगताप, विजय सरावते, प्रकाश सावंत, महादेव आठवले, संजय सोनवणे, संजय मागाडे, महेंन्द्र रणधीर, नामदेव मुनतोडे, अशोकु शेलार, अनंतराव चिंचोलीकर, राजेंद्र कांबळे, बबन गायकवाड, अरुण गायकवाड, मिलिंद ठोसर, रमेश शिंदे, माणिकराव भोसले, ज्ञानोबा आडसूळे, बाबासाहेब माने, रंजना रणपिसे, प्रेमा चव्हाण, मनिषा कोरके (सर्व रा. पुणे), कल्याण भंडारे, रत्नाप्रभा भंडारे (बीड), छाया गायकवाड (ठाणे), बौध्द उपासिका दुर्गा गवई, शंकुतला गायकवाड, सुनंदा ठोसर, कुसुम वाघमारे (सर्व रा. पुणे) शारदा सातदिवे, संगीता जाधव (संभाजीनगर) आणि जनसमुदाय
बहुसंख्येने मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
......... चौकट .....
महात्मा ज्योतिबा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची संसदेत मागणी करणार : खासदार डॉ. ज्योती वाघमारे
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या दिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा, अशी मागणी आम्ही संसदेत करणार आहोत. असं राज्यसभा नुतन खासदार आयुष्यमती डॉ. ज्योती वाघमारे (सोलापूर) यांनी आपल्या मनोगतात सांगितले.