चैन स्नॅचींगचा गुन्हा 02 दिवसात उघडकीस;मोटार सायकलसह 5, 58, 588 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

shivrajya patra

......
सोलापूर : येथील अवंती नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडलेला चैन स्नॅचींग गुन्हा 02 दिवसात गुन्हा उघडकीस आणण्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकास यश आलंय. तपास पथकाने तांत्रीक माहितीच्या आधारे, 02 विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून 5, 58, 588 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांच्या कार्य तत्पर तपासामुळं नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी घटना म्हणून याकडं पाहिलं जातंय. 

सौ. विजयालक्ष्मी धोंडीराम सावळे (वय- 66 वर्षे, व्यवसाय-गृहीणी, राहणार-घर नं.बी १५ अवंती नगर, मुरारजी पेठ, सोलापूर)  त्यांच्या दोन मैत्रीणींसोबत पायी चालत जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या अनोळखी दुचाकीस्वारांनी भरधाव वेगात येऊन त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून भरधाव वेगात निघून गेले होते. ही घटना 07 एप्रिल रोजी सायंकाळी 06.45  वा. च्या सुमारास अवंती नगरातील मेडप्लस मेडीकल दुकानासमोर असलेल्या कॉर्नरवर घडली.
या घटनेची माहीती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडं गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सहा. पोलीस आयुक्त (विभाग-01) प्रताप पोमण, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी भेट दिली होती. त्यानंतर चावडी पोलीस ठाण्याकडील डी. बी. पथकातील सपोनि संजय क्षिरसागर आणि त्यांच्या पथकास हा गुन्हा उघडकीस मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
डी. बी. पथकाचे स. पो. नि. क्षिरसागर आणि पथकाने तांत्रीक तपास घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून मिळालेल्या माहितीवरुन शोध घेत असता, मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन बीड येथे जाऊन सलग 02 दिवस-रात्र आरोपीतांचा शोध घेतला असता, हा गुन्हा केलेले 02 विधीसंघर्षग्रस्त बालक मिळून आले. 

त्यांच्याकडे या विधीसंघर्षग्रस्त बालकांचे पालक यांच्यासमक्ष चौकशी करता, त्या विधीसंघर्षग्रस्त बालकांनी व्यसनासाठी पैसे नसल्याने मौजमजा करण्यासाठी व व्यसनासाठी काळ्या रंगाचे पल्सर मोटारसायकलवर सोलापूरमध्ये येऊन हा गुन्हा केल्याचे कबूल करुन त्यांनी या गुन्ह्यात तक्रारदार महिलेची जबरी चोरी केलेले 33 ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसुत्र हजर केले. 

गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलला नंबर प्लेट नव्हती, हेही विशेष ! या गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर 220 मोटारसायकल, तसेच दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांचे मोबाईल असा एकूण 5, 58, 588 रुपये किंमतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-01) प्रताप पोमण, वपोनि महादेव राऊत, दुपोनि तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह/बसवेश्वर परीट, पोना/शिवानंद भिमदे, पोकॉ/विनोद व्हटकर, पोकॉ/विनोदकुमार पुजारी,, पोकॉ/कृष्णा बडुरे, पोकॉ/सुरज सोनवलकर, पोकॉ/अमोल खरटमल, पोकॉ शशिकांत दराडे, पोकॉ/अयाज बागलकोटे, पोकॉ/अजय चव्हाण, पोकॉ/विनायक जाधव, पोकॉ/पंकज घाडगे, पोकॉ/सुधाकर माने, पोकॉ/रवी धेंडे, पोकॉ/अतिश पाटील पोकॉ/ज्ञानेश्वर गायकवाड, पोकॉ/नितीन मोरे, पोकॉ/तौसीफ शेख यांनी पार पाडली.
To Top