आचेगावच्या कुस्ती मैदानात दोन मिनिटात शिकंदर शेख यांनं जिंकली दोन लाखाची कुस्ती

shivrajya patra
हिंदकेसरी हजरत पटेल कुस्ती स्पर्धा 
देवा थापाने जसप्रोन सिंगला दिले धोबीपछाड.

सोलापूर/प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील १९६७ सालचे हिंदकेसरी पैलवान हजरत पटेल यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध हरियाणाचा पैलवान अजय बनवाला यांच्यामध्ये दोन लाख रुपये इनामाची कुस्ती उद्योजक प्रमोद मोरे यांच्या हस्ते लावण्यात आली होती. सदरची कुस्ती महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने दोन मिनिटातच निकाल डावावरती जिंकत दोन लाखाचा इनाम मिळविला, तर नेपाळ येथील पैलवान देवा थापा विरुद्ध जसप्रोन सिंग (पंजाब) यांची कुस्ती लावण्यात आली होती. सदरची कुस्ती ही मनोरंजनात्मक होत या कुस्तीमध्ये धोबीपछाड या डावावरती देवा थापाने विजय मिळवत दीड लाख रुपयांचा इनाम मिळविला. 
या कुस्ती स्पर्धेमध्ये दीड लाख, एक लाख इनामाच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. यामध्ये पै. सिकंदर मुजावर पै.नबीलाल दिवाने पै. सर्जेराव काळे, पै. संतोष मोची, पै. शाहरुख खान, पै. विजय वारा पैलवान जीवन भुजबळ, पै. मशीद शेख यांच्यासह अनेक छोट्या-मोठ्या पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या, त्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले अशी माहिती कुस्त्यांचे संयोजक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख पैलवान प्रताप चव्हाण यांनी दिली.

या कुस्तीच्या फडामध्ये पैलवान रमेश क्षीरसागर, बोला पटेल, खुशीने जवळघे ,लारा बळुरे, आंबा काळे, श्रीशैल उपाध्ये, सिकंदर पटेल, कुशोउद्दीन देवफोढे, मल्लू खोबरे, यासीन बिराजदार, विठ्ठल बाळगे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. 

या कुस्ती स्पर्धेचे आयोजन पै. हुसेन पटेल, हसन पटेल, सुरेश मोची, मैनोद्दीन भागानगरे, इलियास बिराजदार यांनी केले होते .या कुस्ती स्पर्धा मध्ये शंभर रुपयांपासून ते वीस हजार रुपयापर्यंत कुस्त्या नेमण्यात आल्या होत्या.

या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महेश धाराशिवकर, चंद्रकांत रेम्बोसु, दत्ता माने, संतोष केंगनाळकर, संतोष बडवे, अप्पू गोटे, नाना कळसकर, जर्गिस मुल्ला, आदी मान्यवर उपस्थित होते. 

यांनी दिली देणगी 
आचेगाव येथील कुस्ती मैदानाकरिता उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे, मनोरमा परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे यांनी आर्थिक मदत केली होती. 

चौकट
उद्योजक मोरे देणार नवीन आखाडा बांधून 
आचेगावच्या मैदानामध्ये राज्यातून नाहीतर परराज्यातूनही पैलवान कुस्तीसाठी येतात. त्यामुळे या गावाला कुस्ती स्पर्धा भरवण्याकरिता आखाडा लहान पडत आहे. सदरची गरज ओळखून उद्योजक प्रमोद मोरे यांनी पुढच्या वर्षीच्या कुस्ती स्पर्धेकरिता मोठा आखाडा बांधून देण्याचे अभिवचन दिले.
To Top