सोलापूर : सोलापूर शहर मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळ २०२५-२६ च्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी, मीठ गल्ली येथे शिवानुभव मंगल कार्यालयात मोठ्या जल्लोषमय वातावरणात पार पडला. आरास स्पर्धेचं प्रथम बक्षीस मानाचा कसबा गणपती, सांस्कृतिक स्पर्धेचं प्रथम बक्षीस सोन्या मारुती युवक मंडळ, शिस्तबद्ध स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस सावजी गणपती तर लेझीम स्पर्धेचे प्रथम मानकरी बाळीवेस तरुण मंडळ ठरले. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे, उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर, ट्रस्टी सुनिल रसाळे, माजी आमदार नरसिंग मेंगजी, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, संजय शिंदे, विजय पुकाळे, कैलास मेंगाणे, अनिल गवळी, गौरव जक्कापुरे, मल्लिनाथ याळगी, सोमनाथ मेंडके, विष्णु मुधोळकर, लता फुटाणे, हेमा चिंचोळकर, विजयकुमार बिराजदार, गणेश चिंचोळी, किसन गर्जे, अभिषेक रंपुरे, जैनोद्दीन शेख, प्रसाद कुमठेकर, जितेंद्र टेंभुर्णीकर यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते, गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी ट्रस्टी गौरव जक्कापुरे यांनी सर्व प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टी सुनील रसाळे यांनी केलं तर, सूत्रसंचालन रविंद्र आमणे यांनी केलं. शेवटी उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
स्पर्धेतील मानकरी मंडळ पुढीलप्रमाणे आहेत.
* आरास स्पर्धा *
प्रथम- मानाचा कसबा गणपती,
द्वितीय विभागून- टिळक चौक तरुण मंडळ,
अष्टविनायक युवक मंडळ, कुंभारवेस,
तृतीय- लाला गणपती सामाजिक संस्था, बुधले गल्ली.
* सांस्कृतिक स्पर्धा *
प्रथम- सोन्या मारुती युवक मंडळ
द्वितीय- कार्यसिध्दी लंबोदर गणपती, शुक्रवार पेठ तृतीय- आपला गणपती प्रतिष्ठान, शेळगी
* शिस्तबद्ध स्पर्धा *
प्रथम- सावजी गणपती
द्वितीय- भोई समाज राजस्थानी युवक मंडळ
तृतीय- जय मातृभुमी तरुण मंडळ, मराठा वस्ती विजापूर वेस तरुण मंडळ
* लेझीम स्पर्धा *
प्रथम- बाळीवेस तरुण मंडळ,
द्वितीय- विभागून
कुबेर गणपती जोडभावी पेठ,
सरदार वल्लभभाई तरुण मंडळ बेगम पेठ
तृतिय- विभागून
स्वतंत्र भारत तरुण मंडळ,
चितोड रजपुत तरुण मंडळ
* झांज स्पर्धा *
ओम गणपती तरुण मंडळ कुचन नगर,
द्वितीय- पावण गणपती खड्डा
* ढोल स्पर्धा *
प्रथम- विश्व विनायक प्रतिष्ठान
विशेष गुणगौरव पारितोषिक
पाणीवेस तालीम तरुण मंडळ,
थोरला मंगळवेढा तालीम तरुण मंडळ,
समर्थ तरुण मंडळ,
मानाचा आजोबा गणपती
या उत्सव मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
