ओपन लिंक्स फाऊंडेशनतर्फे जिल्हास्तरीय “महिन्याचा उत्कृष्ट शिक्षक” पुरस्कारांचं वितरण

shivrajya patra

मोहोळ/यासीन अत्तार: ओपन लिंक्स फाऊंडेशनतर्फे सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कादर शेख, गट शिक्षण अधिकारी महाडीक व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक मेहमूद अहमद अन्सारी यांना विनोबा ॲप अंतर्गत जिल्हास्तरीय 'पोस्ट ऑफ द मंथ अवॉर्ड' मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात जिल्हा स्तरावरील “महिन्याचा उत्कृष्ट शिक्षक” पुरस्कार मिळवलेल्या एकूण १८ शिक्षकांना १३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४:३० वाजता होणाऱ्या सेवा सुविधा अ‍ॅप लोकार्पण सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले होतं.

या सन्मानामुळे शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जाईल तसेच इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

To Top