श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर (शिवस्मारक) यांच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. यामध्ये शालेय स्तरावर देशभक्ती गीतांचे समूहगान स्पर्धा आयोजीत करण्यात येते. या स्पर्धा आयोजनाचे यावर्षी २८ वे वर्षे होतं.
या स्पर्धाच्या बक्षीस विजेत्यास बक्षीस देण्याकरीता श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर (शिवस्मारक) यांच्याकडून प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) यांना आंमत्रीत करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी या बक्षीस समारंभास हजर राहून स्पर्धाकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी लहान मुलांना देशभक्तीपर मार्गदर्शन केले. तसेच विजेत्या मुलांना बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर चे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, गंगाधर गवसने हे हजर होते.
