चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा

shivrajya patra

सोलापूर : येथील फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत, भारतीय 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे हाजी बशीर अहमद बागवान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका गजाला सौदागर होत्या.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभुषा परिधान केले होते. 

शासनाच्या परिपत्रकानुसार 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खतिब उम्मे हबीबा यांनी केलं तर पटेल अशरफ यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.

To Top