ओंकार ऊर्फ नाईन्ट्या एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्द

shivrajya patra

सोलापूर : येथील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील ओंकार ऊर्फ नाईंट्या संतोष नलावडे (वय-२५ वर्षे) याच्याविरुध्द मागील काही वर्षांपासून सातत्याने जिवघेण्या घातक शस्त्राने दुखापत, खूनाचा प्रयत्न, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत अथवा जबर दुखापत पोहोचवणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुध्द पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए कायद्यान्वये बुधवारी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

दमाणी नगरातील सुंदराबाई डागा शाळेजवळ, बांध वस्तीमधील रहिवासी ओंकार ऊर्फ नाईंट्या याच्याविरुद्ध विनयभंग, जबरी चोरी, दगडफेक, खंडणी मागणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आला असल्याचे पोलीस अभिलेखावरून दिसते. 

त्याच्याविरुध्द गंभीर स्वरुपाचे ०७ दखलपात्र व ०१ अदखलपात्र गुन्हे शहरात दाखल आहेत. ओंकार ऊर्फ नाईन्ट्या नलावडे याची शहरातील सामान्य नागरीकांमध्ये दहशत आहे. त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असंही पोलिसांचे म्हणणे आहे.

ओंकार ऊर्फ नाईन्ट्या यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या. त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी त्याच्याविरुध्द एमपीडीए कलमान्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, बुधवारी, ०२ जुलै रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आलं आहे.

To Top