सह्याद्री फाउंडेशन, पोलीस विभाग व आय.आर.बी. यांच्या संयुक्त उपक्रमात महामार्गालगत वृक्षारोपण

shivrajya patra

सोलापूर : उळे येथील सह्याद्री फाउंडेशन, सोलापूर ग्रामीण पोलीस व  (IRB) यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर–तुळजापूर महामार्गालगत वृक्षारोपणाचा कार्यक्रम शनिवारी, उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष व उळेचे उपसरपंच नेताजी खंडागळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, महिला पोलीस उपनिरीक्षक गंपुले, IRB प्रतिनिधी झजेरिया, कुलकर्णी, दत्ता डांगे, राम चौगुले यांच्यासह उळे पंचक्रोशीतील पोलीस पाटील, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षणाबरोबरच स्थानिक नागरिकांमध्ये सामाजिक वनीकरणाची जाणीव निर्माण करणे हे होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सह्याद्री फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत, असं आवाहन यावेळी करण्यात आले.

To Top