विद्या लोलगेंच्या बोगस स्वाक्षऱ्या करून दिल्या पावत्या; ४७,५०,००० रूपयांची फसवणूक

shivrajya patra

सोलापूर : बहुमजली गृहसंकुलातील गृह विक्रीत ५ जणांकडून मालमत्ता मालकाच्या परस्पर ४७,५०,००० रूपये घेऊन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार वसंत विहार येथे सन २०१८ ते २०२२ च्या दरम्यान घडला. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अब्दुल खय्युम इब्राहिम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विजापूर रस्त्यावरील ब्रह्मचैतन्य नगरातील रहिवासी विद्या मिलिंद लोलगे यांनी वसंत विहार परिसरात प्रेषक रेसिडेन्सी नावाचे परिचित बहुमजली गृहसंकुल उभारले. यातील फ्लॅट विक्री करताना, त्यांच्याकडील नोकर अब्दुल खय्युम इब्राहिम शेख (वय-४५ वर्षे, रा-९३, साई नगर गृहनिर्माण संस्था, जुळे सोलापूर) याने मालमत्ता धारकाचे काही ग्राहकांना वेगवेगळ्या मजल्यावरील फ्लॅट दाखवून विद्या लोलगे यांच्या परस्पर अनेकांकडून मोठ्या रक्कमा घेऊन बोगस स्वाक्षऱ्या करून पावत्या दिल्या.

त्यात प्लॅट नं १०४ करीता रविंद्र पाटील यांच्याकडून १३ लाख रूपये, प्लॅट २०२ करीता उमा लोकरे यांच्याकडून १० लाख रूपये, प्लॅट नं ४०१ करीता परमार यांच्याकडून २४ लाख रूपये  आणि प्लॅट नं २०२१ करीता हिबारे यांच्याकडून ५० हजार रूपये असे एकूण ४७,५०,००० रूपये रोख स्वरूपात विद्या लोलगे यांच्या परस्पर घेतलेल्या रक्कमेचे आकडे आहे. हा सन २०१८ ते २०२२ च्या दरम्यान घडल्याचं विद्या लोलगे यांनी फिर्यादीत म्हटलंय. 

त्याचबरोबर प्लॅट नं २०६ करीता सोनाली त्रिकप्प यांच्याकडून ०५ लाख रूपये घेऊन त्यांना प्लॅटचा ताबा देऊन त्यांनी पैसे दिल्याबाबत खोटी पावती देऊन, त्याच्यावर लोलगे यांच्या खोट्या सह्या करून विद्या लोलगे यांची ४७,५०,००० रूपयांची फसवणूक केली. त्यानुसार अब्दुल खय्युम शेख याच्याविरुध्द भादवि ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सपोनि खंडागळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top