आषाढी वारी कालावधीत पंढरपूर शहर व विविध ठिकाणी दारू बंदीचे आदेश

shivrajya patra

सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2025 निमित्त पंढरपुर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

04 जुलै ते 07 जुलै रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून 5 कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहतील.

09 जुलै व 10 जुलै रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून 5 कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने सायंकाळी 05.00 वाजेपासून बंद राहतील.

तसेच आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2025 निमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात) सार्वजनिक शांतता राखणेसाठी, खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

सोमवारी, 30 जून-नातेपुते पूर्ण दिवस बंद राहिल , मंगळवारी, 1 जुलै माळशिरस, अकलुज पूर्ण दिवस बंद राहिल , बुधवारी 2 जुलै रोजी वेळापूर, बोरगांव, श्रीपूर, माळीनगर पूर्ण दिवस बंद राहिल. गुरुवारी, 3 जुलै रोजी भंडीशेगाव, पिराची कुरोली पूर्ण दिवस बंद राहिल. शुक्रवारी, 4 जुलै रोजी वाखरी पूर्ण दिवस बंद राहिल.

या आदेशाचे उल्ल्ंघन करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

To Top