सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा- 2025 निमित्त पंढरपूर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
04 जुलै ते दिनांक 07 जुलै रोजी दरम्यान पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून 05 कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहतील.
09 जुलै व 10 जुलै रोजी पंढरपूर शहरातील व पंढरपूर शहरापासून 05 कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने सायंकाळी 05.00 वाजेपासून बंद.
तसेच आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेनिमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात) सार्वजनिक शांतता राखण्यासाठी, खालील प्रमाणे मद्य विक्री व ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
सोमवारी, 30 जून रोजी नातेपुते पूर्ण दिवस बंद राहिल.
मंगळवारी, 01 जुलै रोजी माळशिरस, अकलूज पूर्ण दिवस बंद राहिल.
बुधवारी, 02 जुलै रोजी वेळापूर, बोरगांव, श्रीपूर, माळीनगर पूर्ण दिवस बंद राहिल.
गुरुवारी, 03 जुलै रोजी भंडीशेगाव, पिराची कुरोली पूर्ण दिवस बंद राहिल.
शुक्रवारी, 04 जुलै रोजी वाखरी पूर्ण दिवस बंद राहिल.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
