सोलापूर : काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा WORK चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) सायंकाळी ७ वाजता मूक प्रदर्शन करीत या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. 
हा हल्ला केवळ काही पर्यटकांवर नव्हता तर संपूर्ण मानवतेवर होता, आणि हल्ला करणारे हे लोक मानव असू शकत नाहीत; ते मानवी रूपात मानवतेचे शत्रू आहेत, अशी भावना ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मूक प्रदर्शनानंतर व्यक्त केली.
आम्ही वसुधैव कुटुंबकमला मानतो आणि कुराणात, देवाने म्हटले आहे की, संपूर्ण मानवजात एक कुटुंब आहे. माझा असा विश्वास आहे की कुटुंबातील एक सदस्य दुसऱ्या कुटुंबातील सदस्याला मारू शकत नाही. दहशतवाद्यांनी केलेला हा हल्ला जगातील सर्वात भयंकर गुन्हा आहे.
तिथे मारल्या गेलेल्या पीडितांसाठी आम्हाला खूप दुःख आहे, आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की, त्यांनी त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी, त्यांच्या कुटुंबियांना धीर द्यावा. भारत सरकारने मानवतेचे शत्रू असलेल्या त्या दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी WORK चॅरिटेबल ट्रस्टचे गौस मणियार, तौसीफ डांगे, असिफ शेख, अनिस पठाण, एजाज धोटीकर आणि महिला पदाधिकारी-सभासद उपस्थित होते.
