मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण
सोलापूर : पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षापासून आंदोलनं, उपोषणं आणि निवेदनांच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती कटिबद्ध आहे. पत्रकारांचे प्रश्न सुटल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली. 
पत्रकार सुरक्षा समितीचे यंदाचे 09 वे वर्ष आहे. पत्रकार सुरक्षा समितीच्या राज्यस्तरीय 2025 चा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन येथील समाज कल्याण केंद्र इथं करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पत्र महर्षी 'दर्पण' कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचं पूजन व पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण कदम, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील संजीव सदाफुले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षी पेठे, शिवसेना जिल्हाप्रमुख (उ.बा.ठा.) प्रा. अजय दासरी, पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, दैनिक 'तुफान क्रांती' चे संपादक मिर्झा गालिब मुजावर, पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष आन्सर तांबोळी (बी. एस.), सेवानिवृत्त तथा प्रसिद्ध कुष्ठरोग तज्ञ डॉ. यु. एफ. जानराव यांच्या प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार होते.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना यशवंत पवार यांनी, पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांसाठी करत असलेल्या कार्याची थोडक्यात लेखा-जोखा मांडत, वतीने गेले आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना, यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी, राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, ग्रामीण भागातील पत्रकारांना एस.टी. बस मधून मोफत प्रवास, इत्यादी प्रश्नावर सातत्याने संघर्ष करीत असल्याचेही सांगितले.
पत्रकारितेबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो.
यावेळी प्रमुख मान्यवरांचा पत्रकार सुरक्षा समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्याचं कौतुक करून पत्रकार सुरक्षा समितीच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. .jpg)
आदर्श पत्रकार : राजू वग्गू, अंबादास गज्जम, अरुण सिडगिद्दी, लक्ष्मण सुरवसे, अतुल भडंगे, रक्षंदा स्वामी, श्रीकृष्ण देशपांडे, कलीम शेख, सागर पवार, इम्तियाज अक्कलकोटकर, प्रवीण राठोड, अजमेर शेख, सारिका चुंगे, नंदकुमार बगाडे, लहू कुमार शिंदे, अशपाक शेख, गणेश कारंडे, निरंजन बोध्दूल, वसीम राजा बागवान आणि इक्बाल शेख
आदर्श वकील : सिद्धांत सदाफुले, शिव कैलास झुरळे
आदर्श कुटुंब प्रमुख : आन्सर तांबोळी (बी. एस.)
कृषिभूषण : शुक्राचार्य शेंडेकर
ग्रामपंचायत आदर्श सेवक : महादेव शेवाळे
कृषिरत्न : सागर गुंड
आदर्श रक्तपेढी : महात्मा बसवेश्वर रक्तपेढी, सोलापूर चेअरमन वैभव राऊत
रेशीम रत्न : अमर पवार
यशस्वी उद्योजक : वजीर मुलाणी
आदर्श समाजसेवक : तानाजी माने, सतीश गडकरी
इत्यादींचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या भावा वाटचालीस कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक सादिक शेख, जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, रोहित घोडके, योगिनाथ स्वामी, रमजान मुलाणी(शिवराज्य पत्र), दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप, गोपी जगताप, इमरान आत्तार, वैजनाथ बिराजदार, अकबर शेख, संभाजी गोसावी, सचिन शिंदे, मच्छिंद्र सराटे, भागवत भरगंडे, विजयकुमार झुंजा, विनायक वाघमारे, मल्लिकार्जुन हेगडे, मेहबूब कादरी, शकील शेख इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर जिल्हा संघटक सादिक शेख यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
.jpg)
