तहसील कार्यालय अंतर्गतच व्हावीत ऑनलाईन नोंदणी कामे

shivrajya patra

धामोरी/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची विविध कामे कोपरगाव तहसील कार्यालयात कामे असतात. रेशनकार्ड वरील नवीन नाव समाविष्ट करणे, चुकीचे दुरूस्त करणे, शेती संदर्भातील ऑनलाईन नोंदणी कामे,असे विविध कामे तहसील कार्यालयाच्या अंतर्गतच झाली पाहिजे अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेतून केली जात आहे.

मंगळवारी,१३ मे रोजी कोपरगांव तहसील कार्यालयात आपल्या रेशन कार्ड यादीत एक नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी गेलेल्या नागरिकास, आमच्या ऑफिसमध्ये ते काम होत नाही, तुम्हाला ते सेतू कार्यालयातच करावे लागणार असं सांगण्यात आलं. यासाठी सेतू कार्यालयात अव्वा ते सव्वा फी आकारली जाते, परंतु साधारणपणे मोलमजुरी करणाऱ्या सामान्य नागरिकांचे काय ? असा सवाल शेतमजूर-कष्टकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

तरी संबंधित कोपरगांव तहसीलदार कार्यालय अधिकारी यांनी या विषयावर लक्ष देऊन आपल्या कार्यालयातच ऑनलाईन नोंदणी कामे सुरू करावी, अशी ग्रामीण भागातील जनतेची मागणी आहे.

To Top