आवडेल ते शिक्षण घ्या; ‘लोकमंगल’ तुमच्या पाठिशी : आ. सुभाष देशमुख

shivrajya patra

विद्यार्थ्यांना पाठबळ; लोकमंगल फौंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सोलापूर : आजचे युग हे स्पर्धेचे आहे. विद्यार्थ्यांनी  दहावी नंतर शिक्षण कुठले घ्यावे, हे ठरवावे. चांगले शिक्षण घेऊन भविष्यात नोकरी करायची का व्यवसाय करायचा याचा विचार करावा. आपल्याला आवडते ते शिक्षण घ्या, जिद्द सोडू नका विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास लोकमंगल फौंडेशन कायम त्यांच्यासोबत असेल, असे सांगत आ. सुभाष देशमुख यांनी  विद्यार्थ्यांना पाठबळ दिले.

लोकमंगल फाउंडेशनच्यातीने दहावीमधील गुणवंत विद्यार्थी तसेच निवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम शिवस्मारक येथे शुक्रवारी पार पडला, यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. सुभाष देशमुख बोलत होते.

परिस गायकवाड याने जसे खूप वेळा अपयश येऊन सुद्धा यश मिळवले. जिद्द सोडली नाही त्याप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असावे असे सांगितले तसेच लोकमंगल प्रत्येक विद्यार्थ्यासोबत मदतीसाठी आहे, असे सांगितले. 

या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून  एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झालेले वैष्णवी राम गायकवाड व परीस सुरेश गायकवाड  उपस्थित होते. यावेळी विविध शाळेतील 127 विद्यार्थिनी आणि 12 सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार आ. देशमुख, वैष्णवी गायकवाड व  परीस गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार शिक्षण घ्यावे. मुलांची आवड कशात आहे, हे पालकांनी ओळखावे. शिक्षणात अपयश आले तरी खचून जाऊ नये. परिस गायकवाड याने जसे खूप वेळा अपयश येऊन सुद्धा यश मिळवले, जिद्द सोडली नाही त्याप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असावे. परीस आणि वैष्णवी गायकवाड यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असंही आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.

ध्येय निश्चित करून शिक्षण घ्यावे, आपल्या आवडीनुसार शिक्षण घेत त्यात प्राविण्य मिळवावे, स्पर्धा परीक्षेची आवर्जून तयारी करा, अपयश आले तरी न खचता प्रयत्न करत रहा, असा सल्ला वैष्णवी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला. 

परिस गायकवाड म्हणाले की, मला स्पर्धा परीक्षेतून खूप वेळा अपयश आले तरी देखील मी माझी जिद्द सोडली नाही. माझ्या प्रयत्नामुळे मी आज यशस्वी झालो. असे यश प्रत्येक विद्यार्थी मिळवू शकतो, त्यासाठी कष्ट करावेत.  दहावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर कमी गुण मिळवून पास होणार्‍या विद्यार्थ्यांचे देखील शाळेतून कौतुक करणे हे तितकेच गरजेचे आहे, असेही परीस गायकवाड म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि लोकमंगल फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी लोकमंगलचे संचालक उत्तम शिंदे, प्रकाश मोकाशी, प्रल्हाद कांबळे, सुजाता सुतार आधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारुती तोडकर व लोकमंगल समुहाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

To Top