प्रहार च्या 'संताजी आणि धनाजी' पुरस्कार वितरण सोहळ्यात महंमद पठाण बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्काराने सन्मानित

shivrajya patra

सोलापूर : प्रहार जनशक्ती पक्ष, सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष रुग्णसेवक महंमद पठाण (उळेगाव) यांना संताजी आणि धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रहार च्या वतीने माजी आमदार बच्चु कडू यांच्या उपस्थितीत हस्ते बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी, १२ मे रोजी विजापूर रस्त्यावरील निर्मिती लॉन्स आयोजित करण्यात आला होता. रुग्णसेवक महंमद पठाण यांना बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. 

To Top