जिजाऊ ज्ञान मंदिरची सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम

shivrajya patra

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कोंडी येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा एस.एस.सी. मार्च 2024-25 चा निकाल 100 टक्के लागला. या प्रशालेतून 47 विद्यार्थी एसएससी परिक्षेस बसले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलने सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखलीय.

यंदा कु. आदिती अजय सोनटक्के या विद्यार्थीनीनं 92.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. स्नेहल समाधान पाटील 88.20 टक्के गुण प्राप्त करुन दुसऱ्या तर कु. धानम्मा इरय्या हिरेमठ ही विद्यार्थीनी 87.20 टक्के गुणांवर तृतिय स्थानी आली. 

अखिलेश नितीन गायकवाड (86.60 टक्के), श्रीशैल्य तुळीराम गायकवाड (86.20 टक्के), कु. श्रेया अण्णासाहेब कोडक (86.00 टक्के), आरुष उदय वैद्य (85.60 टक्के), कु. समृद्धी परमेश्वर नीळ (83.00 टक्के), प्रणव संदिपान जावळे (83.00 टक्के), कु. श्रद्धा शरद जाधव (82.60 टक्के) इतके गुण प्राप्त केले.

47 विद्यार्थ्यांपैकी 42 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, संस्थेचे संस्थापक शिवश्री गणेश निळ, प्राचार्य सौ. सुषमा नीळ, मुख्याध्यापिका सौ.अर्चना औरादे, प्रशालेचे मुख्याध्यापक वैभव मसलकर यांनी अभिनंदन केलं आहे.

To Top